🕒 1 min read
मुंबई: शिवसेनेशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. यानंतर शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. शिवसेनेने शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली असून त्याला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शिवसेना आणि शिंदे गट यांनी अशा अनेक याचिका दाखल केल्या असून याबाबत अजून सुनावणी होणे बाकी आहे. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
“मुख्यमंत्री महोदयांनी आज दोन मंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये नामांतराबाबत जे निर्णय घेतले हेच निर्णय काही दिवसांपूर्वी मविआ सरकारने घेतलेले होते. जे अल्पमतातील सरकारचे निर्णय असे आपण जरी म्हणालात तरी मात्र कोर्टाचा निर्णय येईपर्यंत तुम्हा दोघांचे सरकार तरी टिकेल का?”, असे ट्वीट मिटकरी यांनी केले आहे.
मागील सरकारला वारंवार अल्पमतातील सरकार ठरवणारे आपण येणाऱ्या काळात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आपले सरकार कायमस्वरूपी ताम्रपट घेऊन राहील का याचेही चिंतन करा.@mieknathshinde @Dev_Fadnavis
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 16, 2022
तसेच मागील सरकारच्या काळात सर्वात जास्त निर्णय नगर विकास खात्यासंदर्भात घेतल्या गेले. या निर्णयाबाबत आपण जनतेसमोर काहीच बोलला नाहीत. नगर विकास खात्याचे सर्व निर्णय आपण का रोखले कृपया हेही महाराष्ट्राला कळू द्या. मागील सरकारला वारंवार अल्पमतातील सरकार ठरवणारे आपण येणाऱ्या काळात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आपले सरकार कायमस्वरूपी ताम्रपट घेऊन राहील का याचेही चिंतन करा. असा सल्ला मिटकरी यांनी दिला आहे.
नामांतराबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय-
दोन दिवसांपूर्वी १४ तारखेला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणे, थेट सरपंच, नगराध्यक्ष निवड असे मोठे निर्णय घेतल्यानंतर आज पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यात औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावर शिंदे सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला.
२९ जूनला पूर्वीच्या सरकारने काही निर्णय घाई-गडबडीने घेतले. पुढे त्यावर कायदेशीर बाबी निर्माण होऊ नये, म्हणून हे प्रस्ताव फेरसादर करण्याचे आदेश आम्ही दिले होते. आज नामांतरासंदर्भातल्या फेरप्रस्तावांना रीतसर मान्यता देण्यात आली असून औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद शहराला धाराशिव तर नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ, असे नाव देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
- Cabinet decision | औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामकरण ; मुख्यमंत्र्यांची माहिती
- Raj Kundra | राज कुंद्रा करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण; तुरुंगातील अनुभव पडद्यावर दाखवणार
- Kirit Somaiya | हात जोडतो, पण आता तरी मेट्रोचं काम होऊ द्या – किरीट सोमय्या
- Prakash Ambedkar : “यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घ्यावी”, प्रकाश आंबेडकरांची मागणी
- Vijay Shivtare on Sanjay Raut | “वैद्यकीय क्षेत्रात स्किझोफ्रेनिया नावाचा एक रोग…” ; विजय शिवतारेंचा संजय राऊतांवर घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
