🕒 1 min read
IND vs BAN T20 | अॅडलेडमध्ये आज भारत आणि बांगलादेश संघ आमनेसामने आहेत. T20 विश्वचषक 2022 चा हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात विजय आवश्यक आहे. कारण येथे पराभूत संघाचा मार्ग खडतर होणार आहे. दरम्यान बांगलादेशने टॉस जिंकला आहे. बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ भारतीय संघ प्रथम फलंदाजी करेल. नाणेफेकीसोबतच दोन्ही संघांनी आपापल्या प्लेइंग इलेव्हनवर शिक्कामोर्तब केले आहे. भारताने आपल्या संघात मोठा बदल केला आहे.
भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांनी आपापल्या संघात एक बदल केला आहे. जिथे भारताने दीपक हुडाला बाहेर ठेवत अक्षर पटेलला संधी दिली आहे. त्याचबरोबर बांगलादेश संघात सौम्या सरकारच्या जागी शरीफुल इस्लामचा समावेश करण्यात आला आहे.
बांगलादेशची प्लेइंग -11
नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शाकिब अल हसन, अफिफ हुसैन, नुरुल हसन, मोसाद्देक हुसेन, यासिर अली, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शरीफुल इस्लाम.
इंडियाची प्लेइंग -11
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, दिनेश कार्तिक, आर अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह
महत्वाच्या बातम्या :
- Ambadas Danve | अंबादास दानवेंनी वेदांता प्रकल्पाचा घटनाक्रम वाचून दाखवत राज्य सरकारवर साधला निशाणा, म्हणाले…
- Sanjay Raut । संजय राऊत आतच राहणार की बाहेर येणार?; जामीन अर्जावर आज महत्वाची सुनावणी
- IND vs BAN T20 | बांगलादेशने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय
- Sheetal Sheth | “खोके सरकार खोटे सरकार”, शीतल शेठ यांनी ‘तो’ व्हिडीओ शेअर करत केला पर्दाफाश
- Udhhav Thackeray । “रावणाने ज्या पद्धतीने सीतेचे अपहरण केले त्याच…”; ठाकरेंचा भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
