Share

IND vs BAN T20 | भारताचे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचे तिकीट पक्के ; बांगलादेशवर ५ धावांनी विजय

Published On: 

🕒 1 min read

IND vs BAN T20 | टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरली आहे. अॅडलेड ओव्हल मैदानावर शकीब अल हसनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताने केएल राहुल आणि विराटच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर बांगलादेशला १८५ धावांचे लक्ष दिले होते. विराट कोहली ४४ चेंडूत ६४ धावा करून नाबाद राहिला. ८ चौकार आणि एक षटकार. त्यामुळे प्रथम खेळताना भारताने ६ गड्यांच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या. अश्विनने शेवटच्या षटकात एक षटकार आणि एक चौकार लगावला. तो ६ चेंडूत १३ धावा करून नाबाद राहिला. भारताने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना. बांगलादेशने ६ ओव्हरमध्ये ६६ धावा केल्या. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला होता. दरम्यान पावसानंतर पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर बांगलादेशला डकवर्थ नियमानुसार ५४ चेंडूत ८५ धावा करायच्या होत्या.

मात्र बांगलादेशला या धावांचा पाठलाग करता आला नाही. भारताने बांगलादेशचा 5 धावांनी पराभव करत पूर्ण दोन गुणांची कमाई केली आणि यासह भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला नंबर दोनवर ढकलले आहे.

भारताचा डाव –

भारतीय कर्णधार रोहित शर्मा केवळ दोन धावांवर हसन महमूदच्या खासगी धावसंख्येवर झेलबाद झाला. यावेळी विराट कोहली आणि केएल राहुलने चांगली भागिदारी केली. केएल राहुचा फॉर्म पुन्हा वापस आला आहे. आजच्या सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले.  केएल राहुलने स्पर्धेतील पहिले अर्धशतक ३१ चेंडूत पूर्ण केले. यामध्ये त्याने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. शाकिब अल हसनने केएल राहुलची विकेट घेतली. केएल राहुल पूर्वी रोहित शर्मा सस्त्यात आऊट झाला होता. रोहितने 8 चेंडूत केवळ दोन धावा केल्या.

केएल राहुलनंतर कर्णधार शकीब अल हसनने सूर्यकुमारचा डाव संपवला. सूर्याने १६ चेंडूत ३० धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. भारताला तिसरा धक्का बसला. त्यानंतर हार्दिक पांड्या देखील बाद झाला. हसन महमूदने १६व्या षटकात हार्दिक पांड्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने पॉइंटवर चेंडू खेळला, यासिर अलीने येथे एक सोपा झेल घेतला. भारताला चौथा धक्का बसला. हार्दिकनंतर कार्तिक १४व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला. कार्तिकला ५ चेंडूत केवळ सात धावा करता आल्या. त्यानंतर अक्षर पटेल देखील धावबाद झाला.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!