Sambhaji Bhide । मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. एकीकडे ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा कलगीतुरा रंगलेला आहे तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. अशातच आता ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली आहे. यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलेले आहे.
‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते. शिंदेंसोबतच्या भेटीनंतर संभाजी भिडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या भेटीचं कारण स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून मी त्यांची भेट घेतली नव्हती. त्यामुळे ही सदिच्छा भेट देण्यासाठी आलो आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी माध्यमांना दिली.
या भेटीबाबात बोलताना ते म्हणाले, “मी राष्ट्रहिताच्या काही मुद्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र, मंत्रीमंडळाची बैठक असल्याने सविस्तर चर्चा झाली नाही. त्यामुळे आगामी काळात त्यांची पुन्हा भेट घेणार आहे”, अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली.
या भेटीचे काही राजकीय अर्थ काढले जात असल्याबाबात विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारचे कौतुक केले. हे सरकार सरकार उत्तमरित्या काम करत असून महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Atul Londhe | रोजगार आणला तर विरोधी पक्ष सुद्धा देवेंद्र फडणवीसांसोबत राहिल – अतुल लोंढे
- Balasaheb Thorat | राज्यातील भारत जोडो यात्रेसंदर्भात बाळासाहेब थोरात यांची माहिती
- Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली स्वतःच्या शेताची पाहणी
- Nitesh Rane । “हिंदूंकडे वाकड्या नजरेने पाहिल्यावर सत्कार व्हायला हे मविआ सरकार नाही”; नितेश राणेंचा हल्लाबोल
- Chandrashekhar Bawankule | “मतांच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे काहीही करतील”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला


