Share

Nana Patole | “कडू व राणांमध्ये हिश्श्याचं भांडण सुरूयं , ५० खोक्यांसाठी…”; नाना पटोलेंची सडकून टीका

Published On: 

Nana Patole | अकोला : गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यात चांगलाच शाब्दिक हल्लाबोल सुरु होता. राणा यांनी कडू यांच्यावर शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत, असे आव्हान दिले होते.

यानंतर आता 1 नोव्हेंबरपर्यंत या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर मोठा बॉम्बच फोडणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिला होता. या दोघांच्या वादात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली. यानंतर राणा यांनी आपले शब्द जाहीरपणे मागे घेतले. यानंतर हा वाद मिटला. मात्र यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहेत. ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आमदार बच्चू कडू आणि रवि राणा यांच्यामध्ये सत्तेतील हिश्श्यावरून वाद आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलीय. पुढे ते  म्हणाले, सत्तेमध्ये बसलेले आमदार ५० खोक्यांसाठी भांडत असतील, आरोप-प्रत्यारोप करत असतील, पण त्यांच्यापेक्षा आम्हाला जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. या दोघांच्या भांडणावर लक्ष देण्याचे काही कारण नाही, असे पटोले यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर देखील निशाणा साधला. अकोला शहरात सलग हत्येच्या दोन घटना घडल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. ते सुपरमॅन आहेत, सहा-सहा जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेतले. मात्र, आता त्यांना काम जमत नसल्याचं नाना पटोले म्हणाले.

त्याचबरोबर राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे, कुठेही सरकारचे लक्ष नाही. फक्त सत्ताधारी राज्याच्या तिजोरीतील जनतेचे पैसे लुटत आहेत. भ्रष्टाचार आणि भय या दोन गोष्टीच्या आधारावर महाराष्ट्रातले ईडीचे सरकार निर्माण झालेले आहे. ते फक्त लूटपाट करण्यासाठी असून जनतेच्या सुरक्षेसाठी नाही, असे आरोप नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर यावेळी केले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!