Share

Bachhu Kadu । “पहिली वेळ आहे म्हणून माफ, यापुढे काही कराल तर…” ; बच्चू कडूंचा कुणाला इशारा?

Published On: 

🕒 1 min read

Bachhu Kadu । अमरावती : गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यात चांगलाच शाब्दिक हल्लाबोल सुरु आहे. राणा यांनी कडू यांच्यावर शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत, असे आव्हान दिले होते. यानंतर आता 1 नोव्हेंबरपर्यंत या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर मोठा बॉम्बच फोडणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिला आहे. तर यानंतर आता राणा यांनी आपले शब्द जाहीरपणे मागे घेतले. यानंतर हा वाद मिटला.

रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी आज कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. तसेच या मेळाव्यात त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनही केले. यावेळी त्यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली. पहिली वेळ आहे म्हणून माफ आहे. यापुढे काही कराल तर प्रहारचा वार काय असतो हे दाखवून देऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांना नाव न घेता दिला.

कोणी काय म्हटलं हा विषय महत्त्वाचा आहे. कारण अस्तित्वाचा आहे. कोणीही यावं आणि काहीही म्हणावं एवढे काय आम्ही स्वस्त नाहीये. पहिली वेळ आहे माफ आहे. आगे कुछ करेगा और कोईभी करेगा ना… मग प्रहारचा वार काय असतो हे तुम्हाला सांगू, असा इशारा देत त्यांनी रवी राणा यांचे कान टोचले आहेत.

पुढे ते म्हणाले, आम्ही गांधीजींना मानतो. पण भगतसिंह आमच्या एवढ्या डोक्यात आहे की आमची कधी सटकते ते माहीतच पडत नाही. त्यामुळे त्याचाही विचार करा. आम्हीही अपशब्द बोलणार नाही. आम्हीही आचार संहिता पाळू. कुणाचं मन दुखावेल असं कधी करणार नाही. केवळ सरकारमध्ये आहे म्हणून मंत्रिपदासाठी करतोय असं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!