Share

मोठी बातमी : कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवलं ! जाणून घ्या नवा नियम

Published On: 

दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा जाणवत असल्याने आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर आता केंद्र सरकारने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार गटाने सल्ला दिला होता.

सध्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर ६ ते ८ आठवडे इतकं होतं. आता ते अंतर वाढवून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. म्हणजेच, कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर आता दुसरा डोस थेट १२ ते १६ आठवड्यांनंतर अर्थात ३ ते ४ महिन्यांनंतर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, कोवॅक्सिन लसीच्या डोससाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

लसींच्या मुबलक साठ्याअभावी महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण थांबवण्यात आलं असून दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य दिलं जात आहे. आता कोविशिल्ड लसीच्या डोसमधलं अंतर वाढवल्यामुळे लसीकरण सुरळीतपणे करण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!