मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मीडिया प्रचारासाठी सहा कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला होता. हे प्रकरण समोर येताच विरोधकांनी हल्लाबोल केल्यानंतर अजित पवार यांनी हा शासन निर्णय रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, या खर्चावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीसह शिवसेनेवर प्रहार केला आहे. शिवसेना आणि राणे कुटुंबीय यांचं वैर सबंध महाराष्ट्राला ठाऊक आहे. अशातच, शिवसेनेनं भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन केल्यापासून राणे कुटुंबीयांनी आरोपांची व टीकांची सरबत्ती केली आहे.
आता एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शिवसेनेवर नितेश राणे यांनी गंभीर आरोप केला आहे. ‘या सरकारने रिक्षावाल्यांचे १५०० रुपये अजून दिलेले नाहीत. गहू, तांदूळ देणार होते त्याचा एक दानाही मिळालेला नाही. साडेपाच हजारांचं पॅकेज जाहीर केलं होतं त्याचं काहीही झालेलं नाही, एक रुपयाही मिळालेला नाही. दुसरीकडे सहा कोटी खर्च होत आहेत.’ असं भाष्य राणेंनी केलं आहे.
पुढे ते म्हणाले, ‘हे पैसे फक्त उपमुख्यमंत्री खर्च करत नाही आहेत. महाराष्ट्र सरकारने अनेक खासगी एजन्सींना नेमलं आहे. रेन ड्रॉप नावाची एजन्सी आहे, ज्यामार्फत दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान अख्तर यांना मोठ्या प्रमाणात पैसे दिले जात आहे. काही लोकांना तर शिवसेना भवनमधून फोन केले जात आहेत. याचे पुरावे आमच्याकडे आहेत. छोटे कलाकार असतील तर दोन-तीन लाख आणि मोठे असतील तर १०-१५ लाख इतके पैसे दिले जात आहेत,’ असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘वाझे व देशमुखच्या 100 कोटीतून अजितदादांनी सोशल मिडियावर खर्च करावा
- ‘लस तर नाही, मग त्या कॉलरट्युन का वाजवत आहात?’ दिल्ली हायकोर्टाने केंद्राला खडसावले
- ‘मुस्लीम प्रोटीनयुक्त आहार घेतात, हिंदूंनीही अंडी-मटन खावे’, आ.संजय गायकवाडांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- दहावीच्या परीक्षा घ्या ! परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान
- ‘अजित पवार मराठ्यांचा घात करताहेत’, संभाजी ब्रिगेडचा आरोप


