Share

कोरोनामुळे वाढते मृत्यू! कैलासनगर स्मशानभुमीतील गॅस दाहिनी होणार दुरुस्त

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढतच चालले आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कैलासनगर स्मशानभुमीतील गॅस दाहिनीची देखभाल व दुरुस्ती करण्याची तयारी फस्ट संस्थेने दर्शवली आहे. यासंदर्भात फस्ट संस्थेने महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांना पत्र दिले आहे.

शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असून संपूर्ण शहरालाच संसर्गाने विळखा घातला आहे. त्यामुळे नित्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या देखील वाढतच आहे. कोरोनाची दुसरी लाट सर्वाधिक प्रभावित करणारी ठरत आहे. फेब्रुवारी २०२१ पासून या लाटेचा प्रभाव जास्त जाणवू लागला आहे. बाधित रुग्णांचे मृत्यू मोठया संख्येने होत आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर स्मशानभुमीत अंत्यसंस्कार केले जात आहे.

कोरोनाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कैलासनगर स्मशानभुमीतील गॅस दाहिनीची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. या गॅस दाहिनीची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी फस्र्ट संस्थेने आता तयारी दर्शवली आहे. त्यासाठी लागणारा खर्च पालिकेने उपलब्ध करुन द्यावा. त्यासाठी पालिकेसोबत सामंजस्य करार करण्यात येईल, असेही पत्रात नमुद केले आहे. या पत्रावर फस्र्ट संस्थेचे अध्यक्ष प्रितीश चतुर्वेदी यांची स्वाक्षरी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!