🕒 1 min read
नवी दिल्ली:- गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या तीन नव्या शेतकरी कायद्यांविरोधात गेले अनेक दिवस दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांनी एकत्र येत भारत बंद पाळला होता. सत्ताधारी पक्षाकडून आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. या आंदोलनाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. असे असताना भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
शेतकरी आंदोलनावरून वातावरण तापलं असताना भाजपचे माजी केंद्रीय मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह यांनी शुक्रवारी नव्या शेतीविषयक कायद्यांना विरोध दर्शवला. नव्या कायद्यांविरोधात सुरू असलेलं आंदोलन हे आता केवळ शेतकऱ्यांपुरतंच मर्यादित नसून सर्वांचे आंदोलन झाले आहे असं ते म्हणाले.
दरम्यान, नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ पंजाब, हरियाणा येथील शेतकरी गेल्या तीन आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर निदर्शने करीत आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, परंतु सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत झाले नाही. शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, आम्ही पंजाबच्या शेतकरी संघटनांसह देशातील अनेक शेतकरी संघटनांशी चर्चा करीत आहोत आणि लवकरच यावर तोडगा निघू शकेल.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार : मोदी
- मुंबईत अंबानी-अदानी विरोधात निघणार शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा
- राष्ट्रीय महामार्गावर 1 जानेवारी पासून ‘फास्टॅगची’ अंमलबजावणी
- ई-कॉमर्स नंतर आता अमेझॉन आणणार अनोखी सेल्फ ड्रायव्हिंग कार !
- पुत्र मोह सोडा, लोकशाही वाचवा; ‘या’ नेत्याने सोनिया गांधींना दिला सल्ला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
