Share

मोदींना आडव जाणाऱ्या निवडणूक आयुक्तांच्या पत्नींना आयकर विभागाची नोटीस

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : देशाचे निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या पत्नी नोवेल सिंघल लवासा यांना आयकर विभागानं नोटीस बजावली आहे. नोवेल यांनी भरलेल्या आयकर परताव्यासंदर्भातील काही तपशील विभागानं मागविले आहेत. ‘द इंडियन एक्स्प्रेस’नं ही बातमी दिली आहे.

नोवेल या माजी बॅंकर आहेत. त्या किमान तीन कंपन्यांच्या संचालक पदावरही आहेत. ‘मी माझे सर्व कर वेळेवर भरले असून उत्पन्नाचं सर्व विवरण योग्य प्रकारे दिलं आहे,’ असं स्पष्टीकरण नोवेल यांनी दिलं आहे. दरम्यान करचुकवेगिरीच्या कथित आरोपाखाली ही पाळत ठेवली जात असल्याची माहिती मिळत आहे.

अशोक लवासा हे निवडणूक आयुक्त आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यावेळेस पाच प्रकरणात अशोक लवासा यांनी मोदी आणि शहांना ‘क्लीन चीट’ देण्यास आक्षेप घेतला होता.

तर, अशोक लवासा हे लोकसभा निवडणुकीवेळी चर्चेत आले होते. लवासा यांनी आचारसंहितेच्या कथित उल्लंघनाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधातील 11 तक्रारींवर निवडणूक आयोगाकडून क्लीनचिट देण्याच्या निर्णयावर असहमती व्यक्त केली होती. मोदी आणि शाह यांना क्लीनचिट देण्यास लवासा यांनी विरोध दर्शविला होता. 4 मे रोजी पत्र लिहून लवासा यांनी आयोगाच्या बैठकीत स्वतःच्या मताल महत्त्व न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1176366887464140800?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1176364789179678720?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1176357369485283328?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!