Share

वंचितच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली असतानाच बुधवारी आयकर विभागाने चांदिवली विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अबुल हसन खान यांच्या साकीनाका येथील कार्यालयावर छापा मारला. या कारवाईत आयकर विभागाला १ हजार १०० रुपये रोख रक्कम आढळून आली.

वंचितच्या अंधेरी पूर्वेकडील साकीनाका येथील गरीब नवाज कॉर्पोरेशन येथील कार्यालयावर हा छापा मारण्यात आला. छापा मारण्यात आला तेव्हा कार्यालयात पाच जण होते. दिवसभर येथे चौकशी सुरू होती.

या कारवाईदरम्यान आयकर विभागाला १ हजार १०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. दिवसभर घटनास्थळी चौकशी सुरू होती, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस डॉ. ए.आर. अंजारिया आणि चांदिवली येथील उमेदवार अबुल हसन खान यांनी दिली. कारवाई म्हणजे अन्याय असून, भाजप-शिवसेना ही कारवाई सूडबुद्धीने करीत आहे, असे त्यांनी सांगितले.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!