मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्प सादर करताना उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, अमरावती, परभणीत मेडिकल कॉलेज उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेले उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना आता पूर्णत्वास येणार आहे. शासनामार्फत आज जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्यविषयक अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.
राज्यातील अन्य ठिकाणी असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाप्रमाणे मराठवाड्यातही वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे अशी मागणी परभणी आणि उस्मानाबादकरांनी केली होती. गेली अनेक वर्ष निवडणुकीत या विषयाची वारंवार घोषणा होत होती. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले नव्हते. महाविकास आघाडी सरकारने आज मांडलेल्या अर्थसंकल्पात मराठवाड्याला न्याय देताना दोन जिल्ह्यात एमबीबीएस कॉलेज सुरू करण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे जिल्ह्याच्या वैद्यकीय सुविधेत या महाविद्यालयांनी आणखीन भर पडणार आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील मागास भागातील विद्यार्थ्यांना आता आपल्या जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करता येणार आहे. राज्य शासनाने उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पात सभागृहात सादर करत असताना चार जिल्ह्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे या ठिकाणच्या वैद्यकीय सुविधेत भर पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- मोठी बातमी! महिलांच्या नावाने घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत, अजित पवारांची घोषणा
- औरंगाबादेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे अभिनव आंदोलन
- बिदाईला नवरी रडता रडता बेशुद्ध, ऱ्हदयविकाराने जागीच मृत्यू
- भूमाफियांसाठी राज ठाकरे यांनी नाणार बाबतची भूमिका बदलली ?
- जाणून घ्या राज्यात 20 हजार छोट्या सभा, बैठका घेण्यामागे नेमका भाजपचा उद्देश काय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

