औरंंगाबाद : हिमायतबाग परिसरात आंबे विक्रीचा व्यवसाय करणार्या विक्रेत्यास तलवारीचा धाक दाखवणार्या युवकास गुन्हेशाखा पोलिसांनी जेरबंद केले. प्रविण मधुकर सोळस (वय २७, रा.भिमराजनगर, हिमायतबाग) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या युवकाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक तलवार जप्त केली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांनी गुरूवारी (दि.१३) दिली.
बेगमपुरा परिसरातील डिंबर गल्ली येथील रहिवासी विनोद ज्योतीष कुंडार (वय ३२) हे १० मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हिमायतबाग परिसरात आंबे विक्री करीत होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या प्रविण सोळस याने त्यांना तलवारीचा धाक दाखवून फुकटात आंबे घेवून गेला होता. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश धोंडे, जमादार सय्यद मुजीब, गजानन मांन्टे, मिलिंद भंडारे, भावसिंग चव्हाण, सुनिल मोटे, राहुल खरात, ज्ञानेश्वर पवार आदींच्या पथकाने प्रविण सोळस याला जेरबंद करण्याची कारवाई केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘मला टीम इंडियाचा अभिमान’ ; रवी शास्त्री यांनी केले भारतीय संघाचे अभिनंदन
- सोशल मीडियासाठी काढलेल्या ६ कोटी रुपयांच्या कंत्राटावर अजित पवारांचे मोठे भाष्य,म्हणाले…
- ‘केंद्राने महाराष्ट्रात पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा’, काँग्रेसचा आरोप
- …तर त्यांना बाजूला घेऊन नाराजी सांगेन; कथित नाराजी नाट्यावर अजितदादांच खटक्यावर बोट !
- ठरलं ! स्पुटनिक व्ही लसीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

