Share

कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनने पाकिस्तानी गोलंदाजाला मागे टाकत केला मोठा विक्रम

Published On: 

कानपूर : रविचंद्रन अश्विनने (R.Ashwin) या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये मोठा विक्रम केला आहे. अश्विन २०२१ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. कानपूर कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंगला बाद करून त्याने हा पराक्रम केला.

न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनने न्यूझीलंडच्या सलामीवीरांची मॅरेथॉन भागीदारी मोडली. 151 धावांच्या स्कोअरवर त्याने विल यंगला पॅव्हेलियनमध्ये पाठवले, तो 89 धावा करून बाद झाला. या विकेटसह अश्विन 2021 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. अश्विनने या वर्षात 39 विकेट्स घेतल्या आहेत.

याआधी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीसोबत पहिल्या नंबरवर होता. मात्र, आता अश्विनने आफ्रिदीला मागे टाकले आहे. आफ्रिदीच्या नावावर 38 विकेट्स असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा आणखी एक दिग्गज वेगवान गोलंदाज हसन अली आहे.ज्याने ३५ बळी घेतले आहेत. चौथ्या क्रमांकावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आहे, ज्याने 2021 मध्ये 32 विकेट्स घेतल्या आहेत.

जर आपण रविचंद्रन अश्विनबद्दल बोललो तर तो भारताचा आघाडीचा फिरकी गोलंदाज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो भारतीय कसोटी संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज आहे. या सामन्यात अश्विन आणखी एक मोठा विक्रम करू शकतो. अश्विनने या सामन्यात पाच विकेट घेतल्यास तो हरभजन सिंगच्या मागे भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज बनेल. हरभजन सिंगच्या नावावर सध्या 417 विकेट्स आहेत आणि अश्विन त्याचा विक्रम मोडण्यापासून फक्त 4 विकेट्स दूर आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!