Share

औरंगाबाद स्मार्ट नगरीत ग्रीन बेल्ट राहिला नावापुरताच; मनपा फुटपाथ रंगवण्यातच व्यस्त!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबादचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आला आणि शहरात विकासाची अनेक कामे सुरु झाल्याचा गाजावाजा महानगरपालिकेने केला. गेल्या दिड वर्षांच्या प्रशासकांच्या काळात तर ‘वन वे’ कारभारामुळे शहर स्मार्ट आणि विकासाच्या महामार्गावर असल्याचे चित्र तयार करण्यात आयुक्त पांडेय यांना यश आले आहे. मात्र महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन ते सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी वरवरच मलमपट्टी होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. शहरात ग्रीन बेल्ट मधील अतिक्रमण हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. मात्र मनपा रस्त्यांना रंगवण्यात व्यस्त असल्याने रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या अतिक्रमणाकडे आणि त्यामुळे होणाऱ्या ‘निराळ्याच’ शोभेकडे पालिकेचे लक्ष नाही.

सिडको बसस्थानक झाले खाद्य जत्रा

सिडको बस स्थानकासमोरील ग्रीन बेल्ट मध्ये व्यापारी पेठे बरोबरच एकप्रकारची खाद्य जत्रा वसली आहे. विविध प्रकारच्या पदार्थांची विक्री करणाऱ्या जवळपास ३० ते ४० टपऱ्या याठिकाणी आहेत. त्याचबरोबर पानटपरी विविध वस्तू विकणार्‍यांची यात भर पडली आहे. बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना आपल्या रिक्षात बसवण्यासाठी रिक्षाचालकांनी देखील रिक्षाचा अवैध अड्डाच बनवला आहे. रिक्षा स्टॅन्ड मध्ये रिक्षा उभ्या करण्याऐवजी सर्व्हिस रोडवर रिक्षा थांबवून प्रवाशांना बसवले जाते. त्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात, वाहतूक कोंडी हि येथील नित्याची समस्या आहे.

हि न संपणारी प्रक्रिया – मनपा उपायुक्त निकम

ग्रीन बेल्टमधील अतिक्रमण मनपा नेहमीच काढत असते. मात्र ते पुन्हा पुन्हा होत असेल तर यात मनपाचा कुठलाही रोल नाही. आम्हाला तक्रार प्राप्त होताच आम्ही सदर ठिकाणी जाऊन अतिक्रमण काढून घेतो. अतिक्रमण धारक पुन्हा ग्रीन बेल्टमध्ये कब्जा करतात. हि प्रक्रिया वारंवार सुरू राहते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे सध्या तरी मनपाला शक्य नाही. या अंतर्गत प्रत्येक ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावे लागतील.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!