Share

दुखापतीनंतर दुसऱ्या डावात पंत फलंदाजीसाठी सज्ज मात्र, जडेजा…

Published On: 

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेदरम्यान भारतीय संघाला दुखापतीची चिंता सतावत आहे. भारताने अनेक फलंदाज या मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाले. शनिवारी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटीदरम्यान रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. पंतच्या डाव्या हाताच्या कोपराला पॅट कमिन्सचा चेंडू लागला त्यामुळे त्याला शनिवारी दुसऱ्या सत्रानंतर हॉस्पिटलमध्ये स्कॅनसाठी नेण्यात आले होते.

मात्र दुखापतीचे ग्रहण मानगुटीवर बसलेल्या भारतीय संघासाठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या तिसऱ्या कसोटीत आधीच भारत बॅकफूटवर असताना रविंद्र जडेजा आणि रिषभ पंत शनिवारी (०९ जानेवारी) दुखापतग्रस्त झाले होते. त्यानंतर या दोन्ही खेळाडूंना स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. अष्टपैलू जडेजाचा डावा अंगठा फ्रॅक्चर झाल्याने तो उरलेला सामना आणि उर्वरित मालिकेतून बाहेर पडला. मात्र यष्टीरक्षक फलंदाज पंत दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी सज्ज झाल्याचे समजत आहे.

सिडनी कसोटीतील भारताच्या पहिल्या डावात जडेजाला फलंदाजीदरम्यान डाव्या अंगठ्याला मिशेल स्टार्कने टाकलेला बाऊंसर लागला होता. पण तरीही त्याने फलंदाजी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणासाठी तो मैदानात उतरला नाही. त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले होते. जडेजाच्या ऐवजी मयंक अगरवालने दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण केले.

स्कॅननंतर जडेजाचा अंगठा फ्रॅक्चर असल्याचे निदान झाल्याने प्राप्त माहितीनुसार तो पुढील सहा आठवडे मैदानावर उपलब्ध राहु शकणार नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या आणि पुढील चौथ्या कसोटीसाठी देखील रविंद्र जडेजा खेळणार नाही, हे जवळपास ठरल्यात जमा आहे. मात्र, बीसीसीआयकडून त खेळणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!