Share

‘पूजा चव्हाण प्रकरणी एव्हढे पुरावे असताना मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय ?’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : परळी येथील रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आपले जीवन संपवले. तिच्या मृत्यूनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. महंमदवाडीतील ए वन पार्क या उच्चभ्रू सोसायटीत राहत होती. पूजा चव्हाण ही रविवारी सोसायटीत आपल्या घरात होती. यावेळी सोबत तिचे दोन मित्रही होते. मध्यरात्रीच्या सुमारास तिने अचानक तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, या तरुणीने असे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्यांचं नाव या प्रकरणात जोडलं जात आहे. विदर्भातील एका मंत्र्यासोबत प्रेमसंबंध असून त्यातूनच तीने आपले जीवन संपवल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातील भाजपने या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी, ‘या प्रकरणात पुरावे असताना मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय ?’ असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. ‘गृहमंत्री जी सध्या राज्यातील महिला अत्याचाराबाबत “संजय”ची म्हणजेच जे जे दिसेल ते ते पहावे ते साथी सत्ताधार्यांना कथन करत क्लीनचीट देत पुढे चालावे च्या भुमिकेत दिसताहेत पूजा चव्हाण केस मध्ये मोबाईलच मोठा पुरावा आहे संभाषण क्लीप्स मिळाल्या आहेत.’

ज्यात तिला जीवन संपवण्यास परावृत्त करण्यापासून तर मृत्यू झाल्यानंतर कसही करून तिचा मोबाईल ताब्यात घेण्यापर्यंतच्या सुचना कथित मंत्र्याकडून दिल्याचे रेकॉर्डिंग सगळ्यांनी ऐकल्या. अजूनही याबद्दल पोलिस काहीही स्पष्टता देत नाही. पूजा चव्हाणच्या परीवारावर दबाव असू शकेल. पोलिस अशा केसेस स्यु-मोटो दाखल करून घेऊ शकतात हे मी आपल्याला सांगायला नकोचं. अर्थात त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्वाची आहे मुख्यमंत्री महोदय एव्हढे पुरावे असतांना मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय ?’ असा सवाल चित्र वाघ यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!