Share

पुढच्या ४ दिवसात कोकण मराठवाड्यात अतिमुसळधार पाऊस पडणार तर मुंबईत…

Published On: 

पुणे : सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारण ११० टक्के पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार सप्टेंबरमध्ये पावसाची सरासरी १७० मिलीमीटर आहे. ऑगस्ट महिन्यात दरवर्षीच्या तुलनेत २४ टक्के कमी पाऊस पडला आहे. पण सप्टेंबरमध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी व सामान्य नागरिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते.

तर आता भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठीचा पावसाचा अंदाज जारी केला आहे. येत्या 48 तासात उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागनं वर्तवली आहे.

पावसाचा सर्वाधिक प्रभाव पुढील चार पाच दिवसात कोकणात राहणार आहे. मुंबई,ठाणे, पालघर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 6 सप्टेंबरला कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातील लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे, पालघर, मुंबई, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद, यवतमाळ, वर्धा, नागपूर. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!