Share

‘महामार्गाची अवस्था लवकर सुधारली नाही, तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु’; मनसेचा इशारा

Published On: 

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचं काम गेल्या १३ वर्षांपासून सुरू असून रस्त्यावरील खड्डयांच्या साम्राज्यामुळे कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना तसेच वाहतूक व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करत हा प्रवास करावा लागतो. सर्वात गंभीर बाब म्हणजे, या महामार्गावर झालेल्या अपघातांमुळे आजवर दोन हजारांहून अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, असं सांगत मनसेने शुक्रवारी बेलापूर-कोकण भवन येथे आंदोलन केले.

मनसेच्या रस्ते आणि आस्थापना विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात या संपूर्ण महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून विविध ठिकाणच्या निकृष्ट बांधकामाचे व्हीडिओ पुरावे म्हणून जमा केले. महामार्गाच्या दुरवस्थेचा निषेध करत बेलापूर-कोकण भवन येथे मनसैनिकांनी आंदोलन केले आहे.

‘महामार्गाची स्थिती लवकर सुधारली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही’, असा इशारा यावेळी मनसेने दिला आहे. यावेळी मनसेचे उपाध्यक्ष संजय जामदार, रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!