Share

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेत चक्क उर्फी जावेद? जाणून घ्या सत्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिला पोशाखांमुळे देखील ट्रोल देखील केलं जात असून सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत संवाद साधत असते. मात्र आता ती एका फोटोमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. हा फोटो आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांच्याशी निगडीत आहे. एका चाहत्याने अभिनेत्रीसोबतचा एक मजेदार फोटो शेअर केला. जो उर्फीनेही पसंत केला असून सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केला आहे.

दरम्यान उर्फी जावेदने इंस्टाग्राम स्टोरीवर (social media) एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एका सभेत दिसत आहेत. मीटिंग प्रसंगी त्यांच्या समोर टीव्ही सुरू आहे. विशेष म्हणजे उर्फी जावेद टीव्हीच्या पडद्यावर दिसत आहे. हा फोटो उर्फीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे, ज्यामध्ये योगीजी इतर सदस्यांसोबत बसून संभाषण करताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘योगीजींसोबतच्या या बैठकीत उपस्थित असणं खूप छान वाटले. कोणीतरी मला हे पाठवले आणि मी खूप हसले.

Urfi Javed's post

 

उर्फी जावेद नेव्ही ब्लू रंगाच्या साडीत नेसली असून टीव्हीवर दिसत आहे. तसे, हा एक योगायोग आहे की जेव्हा हा फोटो क्लिक केला गेला, त्याच वेळी उर्फी जावेद स्क्रीनवर दिसत होती.

उर्फी जावेद जेव्हा करण जोहरच्या बिग बॉस ओटीटी शोमध्ये सहभागी झाली तेव्हा तो प्रकाशझोतात आली. शोमधून बाहेर काढण्यात आलेली ती पहिली स्पर्धक होती. मात्र या अभिनेत्रीने अल्पावधीतच तिच्या अनोख्या शैलीने चाहत्यांमध्ये लोकप्रियता मिळवली. शोमधून ती ज्या नाट्यमय पद्धतीने रडतबाहेर आली त्यानंही लोकांचं लक्ष वेधून घेतलं. आता उर्फीच्या चाहते तिच्या वेगवेगळया लूकमधील पोस्टची अतुरतेने वाट बघत तिला लाईक, कमेंट करतात.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!