दिल्ली : आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबाद संघाला ७ गडी राखुन पराभुत केले. हैदराबादने दिलेले १७२ धावांचे लक्ष्य चेन्नईने केवळ ३ गडी गमावक एकोणीसाव्या षटकात पुर्ण केले. चेन्नई सुपर किंग्सचा हा स्पर्धेतील सलग पाचवा विजय आहे. धडाकेबाज अर्धशतक करणाऱ्या ऋुतूराज गायकवाडला(७५) सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक झळकावत कॅप्टन इनिंग्स खेळला. या खेळीदरम्याने वॉर्नरने ४० वी धाव घेताच त्याच्या टी२० कारकिर्दीत १०,००० धावा पूर्ण झाल्या. टी२० क्रिकेटमध्ये हा पल्ला गाठणारा तो पहिलाच ऑस्ट्रेलियन फलंदाज बनला आहे. आता वॉर्नरच्या नावावर टी२० क्रिकेटमध्ये १००१७ धावा जमा झालेल्या आहेत. वॉर्नरने ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय टी-२० संघ, आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स व सनरायझर्स हैदराबाद, बीबीएलमध्ये सिडनी थंडर्स तर, हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये न्यू साऊथ वेल्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
10000 T20 runs for David Warner. ♥#Warner10000 #CSKvSRH #IPL2021 pic.twitter.com/7FljzuBChf
— Klaus (@h4sitha) April 28, 2021
तसेच जागतिक क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलकडे जातो. गेलने ४२२ सामन्यात १३८३९ धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या वेस्ट इंडिजचाच कायरन पोलार्डने १०६९४ धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानी पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक आहे. मलिकने १०४८८ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पीएम केअर्स फंडातून तब्बल एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीला मंजुरी
- कोरोना लस वापरात उस्मानाबाद जिल्हा मराठवाड्यात अव्वल!
- रामदास आठवले एक महिन्याच्या वेतनातून आंबेडकरी कलावंतांना मदत करणार
- चेन्नई विरुद्धच्या सामन्यात दिसले वॉर्नरचे ‘कुटूंबप्रेम’; फोटो व्हायरल
- नांदेड जिल्ह्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचे आत्मदहन


