Share

“हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याची भाजपची परंपरा”, नाना पटोलेंचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल(१४ मार्च) सभागृहात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच या प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे नाव अमजद खान ठेवण्यात आल्याचे वळसे-पाटील यांनी सांगितले. त्यानंतर हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याची भाजपची परंपरा असल्याचे म्हणत मी कुणाची जात काढत नाही. पण मला अमजद खान का देण्यात आलं? असा सवाल पटोले यांनी केला आहे.

यासांदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना नाना पटोले म्हणाले की,‘राज्याच्या हितासाठी सर्व आमदारांना निवडून पाठवतात. परंतु लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचे काम फडणवीसांच्या काळात झाले असेल तर त्याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे.’ तसेच हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याची भाजपची परंपरा राहिलेली आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, नाना पटोले यांचे नाव अमजद खान. बच्चू कडूंचे निजामुद्दीन बाबू शेख. संजय काकडे यांचे तरबेज सुतार. तसेच आशिष देशमुख यांचे नाव रघू चोरगे. तर आशिष देशमुख यांचे नाव ठेवलं हिना महेश साळुंके ठेवण्यात आल्याचे वळसे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!