Share

देशात गेल्या २४ तासांतील कोरोना रुग्णवाढीचा व कोरोनामुक्तांचा आकडा ६० हजार पार

Published On: 

नवी दिल्ली : दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा हा वाढतच असून एकूण रुग्णांचा आकडा ३७ लाखांजवळ पोहोचला आहे. त्यामुळे अनलॉक-४ जरी आजपासून देशभरात लागू होणार असले तरी नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

गेल्या २४ तासांत, ६९ हजार ९२१ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या ३६ लाख ९१ हजार १६६ झाली आहे. देशात काल ६५ हजार ८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, त्यामुळे एकूण कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांचा आकडा आता २८ लाख ३९ हजार ८८२ इतका झाला आहे.

#पुणे: पुढच्या वर्षी लवकर या! मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

आतापर्यंत ६५ हजार २८८ लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला असून ८१९ रुग्णांचा मृत्यू गेल्या २४ तासांत झाला आहे. सद्या एकूण ७ लाख ८५ हजार ९९६ ऍक्टिव्ह कोरोना बाधित रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आढळून येत आहेत.

बैलाने गिळले मंगळसूत्र मग…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!