Share

चिंताजनक! मुंबईत मागील २४ तासांत ७१ पोलिसांना कोरोनाची लागण

Published On: 

मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. असे असतांना मुंबईत आता कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात २४ डिसेंबरला रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु त्यानंतर कोरोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, यामुळे पुन्हा एकदा राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. असे असतांनाच आता मुंबईत मागील २४ तासांमध्ये ७१ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे.

मुंबईत मागील २४ तासांमध्ये १५ हजार १६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यांपैकी ७१ रुग्ण पोलीस आहेत. तसेच नवीन रूग्णांसह मुंबईतील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा ९ हजार ५१० वर पोहोचला आहे. तसेच यापैकी १२३ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून २६५ पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत.

दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णांविषयी बोलत असतांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) म्हणाल्या की,’यासर्व परिस्थितीवर मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांचे लक्ष असून आपण जी यंत्रणा उभी केली आहे, त्या यंत्रणेच्या माध्यमातून आजही मग विलगीकरण केंद्र असतील, रूग्णालये, गृह विलगीकरण या सगळ्यांकडे महापालिका म्हणून आमचं लक्ष आहे. आज कुणालाही लॉकडाउन नकोय, निश्चितच लॉकडाउन असताच कामा नये. परंतु जर दररोजच्या रूग्णसंख्येने २० हजारांचा आकाडा ओलांडला तर मात्र केंद्राने दिलेल्या नियमानुसार राज्य सरकार आणि महापालिका या नियमांची पूर्तता करेल.’

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!