Share

वाढती महागाई, हेरगिरी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी नागपुरामध्ये काँग्रेसचा मोदी सरकार हल्लाबोल

Published On: 

नागपूर : वाढत्या महागाई मुळे केंद्र सरकार विरोधात आंदोलन, मोर्चे होत आहे. पेट्रोल, डीझेलचे भाव दररोज वाढत आहे. तसेच पेगासस मुळे विरोधी पक्ष केंद्र सरकारचे जोरदार विरोध करत आहे. यावर संसदीय पावसाळी अधिवेशनात आरोप प्रत्यारोप देखील झाले. तसेच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील केंद्र सरकारवर सामनाच्या अग्रलेखातून टीका केली. कृषी संशोधन कायद्या विरोधात गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे.

यावरच आज नागपूर येथील संविधान चौकात युवा काँग्रेसच्या वतीने हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले होते. त्यावेळी तेथे सरकार विरोधी नारेबाजी झाली. तसेच पोलिसांनी बँरीगेट लाऊन या मोर्चाला अडवले. यावेळी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत जी, क्रीडा व प्राणी संवर्धन मंत्री सुनील केदार जी, ए. विकास ठाकरे, प्रदेश प्रभारी विजयसिंह राजू, अजितसिंग राजेंद्र मुलक, रश्मी बर्वे, तानाजी वनवे, अनीस अहमद यांच्यासह हजारो युवा कामगार उपस्थित होते.

दरम्यान, आज दिल्लीत १००.९१ रुपये लिटर पेट्रोल तर ८९.८८ रुपये लिटर डिझेल आहे. तर , मुंबईत १०६.९३ रुपये लिटर पेट्रोल तर ९७.४६ रुपये लिटर डिझेल आहे. तसेच चेन्नईत १०१.६७ रुपये लिटर पेट्रोल तर ९४.३९ रुपये लिटर डिझेल आहे. यावरुन काँग्रेस मोदी सरकारवर टीका करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!