🕒 1 min read
मुंबई : धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्कार आरोपाचं प्रकरण काहीतरी देऊन सेटल केलं. त्यांनी यासाठी काय दिलं हे त्यांनाच ठाऊक, असे वक्तव्य भाजप नेते निलेश राणे यांनी केले. मंत्री गुन्हा करतात आणि स्वत:लाच क्लीन चीट देतात. ठाकरे सरकारच्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे नाहीत. त्यांनी मनोहर जोशी यांच्यासारख्या माणसाला मुख्यमंत्रीपदावरून काढलं. पण उद्धव ठाकरे यांच्यात तशी धमक नाही, असे भाजप नेते निलेश राणे यांनी म्हटले.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सध्या शिवसेना मंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं जात आहे. याआधी सरकारमधील राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही बलात्काराचे आरोप झाले होते. तर राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरही तरूणीने बलात्काराचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी धनंजय मुडेंवर निशाणा साधला आहे.
मंत्री गुन्हा करतात आणि स्वत:ला क्लीन चीट देऊनचीट देतात. ठाकरे सरकारच्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे नाहीत. त्यांनी मनोहर जोशी यांच्यासारख्या माणसाला मुख्यमंत्रीपदावरून काढलं. पण उद्धव ठाकरे यांच्यात तशी धमक नाही, असं म्हणत निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
दरम्यान, ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवतय. सगळ्या बाजूने अडकलेला संजय राठोड शक्तिप्रदर्शन करतो, कॅबिनेट मीटिंगमध्ये बसतो पण तरीही त्याचा राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यामध्ये नाही. परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे’, अशा तिखट शब्दात निलेश राणेंनी टीका केली.
महत्त्वाच्या बातम्या
- सामाजिक बांधिलकी! धनंजय मुंडेंकडून ‘त्या’ चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा
- मंगलाष्टके नव्हे तर ‘वंदे मातरम्’च्या सुरात जुळल्या अनाथांच्या रेशीमगाठी
- ‘आ.संदिप क्षीरसागरांनी काकांच्या कामाचे श्रेय लाटले’
- जिल्हा मध्यवर्ती बँकासह सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
- बीडमध्ये दहावी, बारावी वगळता सर्व शाळा बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
