टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकांमध्ये कोणाला मत देऊन विजयी करायचं हे जनतेच्या हातात आहे. शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे, लढायचं आणि जिंकायचं. शेवटी वाघ हा एकटा जिंकत असतो,’ असे म्हणत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर निष्ण साधला. आज (ता. १३) सिल्लोडमध्ये आयोजित शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ सभेत जनतेला संबोधित केले.
ते म्हणाले, ” निवडणुका येतात आणि निवडणुका जातात; परंतु कधीही खोटे बोलायचे नाही. ही आमची परंपरा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचीच तशी शिकवण आहे. जे मी बोलेन ते मी करेन हा शिवसेनेचा खाक्या आहे. अब्दुल सत्तार यांना शिवसेनेचे विचार पटले आहेत. म्हणून ते एका विचाराने एकत्र आले आहेत. शिवसेनेचा विरोध हा पाकिस्तानला आहे. हिंदू-मुस्लीम यांची इथे एकजूट होईल तेव्हा पाकिस्तानला सुद्धा कळेल की, हे प्रकरण आपल्या हाताच्या बाहेर गेले आहे.”
त्याचप्रमाणे बंडखोर किंवा अपक्ष उमेदवारान ठणकावून सांगा की, निवडून आल्यानंतर एका रुपयात आरोग्याची चाचणी आणि १० रुपयांमध्ये सकस जेवण तू देऊ शकणार आहेस का? असा टोला त्यांनी यावेळी राणेंना लगावला.
दरम्यान कालच शिवसेनेचा जाहीरनामा ठाकरे यांनी प्रसिध्द केला. भाषण करतान त्यांनी शिवसेनेने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. तसंच बंडखोरांवरही निशाणा साधला. सत्तार आपल्यासोबत आहेत म्हणजे आपल्याकडेच सत्ता येणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1183349253772464128?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183349999200899073?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

