Share

शरजील उस्मानी प्रकरणात योगिनीं उचलले मोठे पाऊल

Published On: 

मुंबई : एल्गार परिषदेतील आपल्या भाषणात शरजील उस्मानी याने ‘हिंदू समाज सडका झालाय’ अशा प्रकारच वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. शरजिल उस्मानी याने भाषणाची सुरुवात करतानाच, ‘आजचा हिंदू समाज सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने त्याने केल होत.

शरजीलच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात राजकीय नेत्यांनी तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे. भाजप या मुद्दावर आक्रमक असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेच तक्रार केली आहे.

यातच एनआयए वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी यांच्या विरोधात लखनऊ येथील हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मविआ सरकारवर टीका केली असून राज्यात येऊन कोणीही हिंदुंना काहीही बोलत आहे. राज्यात केवळ महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामुळे हिंदूंना वाली नाही. सरकार काही करणार आहे की नाही? असा सवाल पाटील यांनी केला होता. हिंदुत्वावर टीका करणाऱ्या शरजील उस्मानी याच्याविरोधात महाराष्ट्रानंतर आता लखनऊमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच त्याच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

अशातच आजच्या सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणविसांना खोचक आश्वासन देत ‘शाब्बास देवेंद्रजी! आपण सरकारची ‘मन की बात’च जाहीर केली !’ अस म्हणत महाराष्ट्र पोलिसांच्या क्षमतेविषयी शंका असू नये. शर्जिलला बेडय़ा पडतीलच. निश्चिंत रहा! ठाकरे राज्यात हिंदूच काय, समाजातला प्रत्येक घटक सुरक्षित आहे. असे आश्वासन देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!