Share

छत्रपती घराण्याचा अपमान केल्याप्रकरणी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल!

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : राज्यात सद्या मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात आंदोलन देखील करण्यात येत आहे. राज्यभरातील मराठा समाजाच्या बैठका होत असून मराठा समाजातील नेते देखील आरक्षण मिळावं यासाठी रणनीती आखत आहेत.

तर, मराठा आरक्षणाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करून लढणाऱ्या ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये बोलताना छत्रपती घराण्याच्या वंशजांबद्दल अपमानकारक वक्तव्य करणं त्यांना चांगलंच भोवलं आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर यांची सदावर्तेंविरोधात तक्रार दिल्यानंतर नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राज्य सरकारने सदावर्तेंवर कडक कारवाई करून बार कौन्सिलने त्यांची सनद रद्द करावी अशी मागणी केली आहे.

हा माणूस आधीपासूनच समाजात द्वेष पसरवण्याचं काम करत आहे

“ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवरील चर्चेत छत्रपती आणि त्यांच्या घराण्याबद्दल जे वक्तव्य केलं, ते अतिशय खालच्या पातळीचं आहे. मी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांचा धिक्कार करतो, निषेध करतो. महाराष्ट्र सरकारकडे माझी स्पष्ट मागणी आहे. हा माणूस आधीपासूनच समाजात द्वेष पसरवण्याचं काम करत आहे. जातीयवाद पसरवत आहे. सदावर्ते यांच्यावर महाराष्ट्र सरकारने स्वतःहून गुन्हे दाखल केले पाहिजेत. त्यांना अटक केली पाहिजे. जातीयवाद आणि सांप्रदायिक दंगली भडकवण्याचा त्यांचा जो उद्देश आहे, तो रोखला पाहिजे.” अशी मागणी त्यांनी केली आहे.

“गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलीची सनद बार कौन्सिलने काढून घेतली पाहिजे, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. कोणत्याही परिस्थितीत असा माणूस जो छत्रपतींबद्दल घाणेरड्या, अतिशय वाईट भाषेत बोलतो, त्याची वकील म्हणवून घ्यायची लायकी नाही. मी पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारकडे त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन अटक करण्याची मागणी करतो” असा तीव्र निषेध देखील विनायक मेटे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Nashik Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या