🕒 1 min read
पुणे : राज्यात काही बेशिस्त नागरिक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. अशा नागरिकांकडून दंड आकारला जातो. पुण्यात अशाच एका नागरिकाकडून वाहतुक नियमभंगाच्या दंडाची 400 रुपयांची रक्कम भरण्यास वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र यावेळी एका कारचालकाने वाहतूक पोलीस हवालदार यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना 700 ते 800 मीटर फरफटत नेले. या घटनेत पोलीस कर्मचारी शेषराव जायभाय यांना दुखापत झाली आहे. यामुळे परिसारत एकच खळबळ उडाली.
याबाबत पोलीस हवालदार शेषराव जायभाय (वय 43) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पुण्यातील मुंढवा पोलिसांनी हडपसर येथे राहणाऱ्या प्रशांत श्रीधर कांतावर (वय 43) याला अटक करण्यात आली असून, प्रशांत कांतावर याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी दुपारी सव्वाचार ते साडेचारच्या सुमारास मुंढवा सिग्नल चौकात खराडी बायपास रोड येथे हि घटना घडली आहे.
दरम्यान, पोलीस हवालदार शेषराव जायभाय आणि त्यांचे सहकारी वाहनांवरील पूर्वीच्या ऑनलाईन खटल्यांची दंडाची रक्कम कारवाई करत होते. तेव्हा जायभाय यांनी गाडीवर पूर्वीचा 400 रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. तेव्हा त्याने गाडीचा हॉर्न वाजवित दंडाची रक्कम न भरता त्यांनी जायभाय यांच्या अंगावर जीवे मारण्याच्या हेतूने गाडी घातली. सध्या या आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
- ३७० कलम रद्द करुनही काश्मीरप्रश्न सुटलेला नाही- मोहन भागवत
- ‘कारवाई करणार असेल तरच यावं अन्यथा…’; उदयनराजेंचे ईडीला पुन्हा एकदा आव्हान
- कुणी ‘शेण खा’ म्हटलं तर तू खातोस का? शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला खोचक सवाल
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
