Share

परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीचा दर पोचला 30 टक्यापर्यंत 

Published On: 

परभणी : शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस आता खुप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चाचणीचे प्रमाण आणि पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येवर सहज फिरवल्यास बाधितांच्या दरवाढीचा टक्का 30 टक्यापर्यंत पोचला असल्याची परिस्थिती आली आहे.

मागच्या महिन्यापासुन शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत खुप मोठी वाढ झाली आहे. विशेषतः अलीकडे दिवसागणीक रुग्णांच्या संख्येत शेकड्यानिशी वाढ होत आहे. कोरोनाचा हा प्रादूर्भाव जिल्हावासियांसह जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीनेही अक्षरशः चिंताजनक आहे. सरकारी यंत्रणेमार्फत दररोज सायंकाळी प्रेसनोटव्दारे जाहीर होणारे आकडे, त्यातील बाधितांची वाढती संख्या सर्वसामान्य नागरिकांना चक्रावणारी ठरली आहे. गुरुवारी सरकारी यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार 249 आरटीपीसीआर चाचण्या दाखविण्यात आल्या. व 713 व्यक्ती बाधीत आढळल्याचे म्हटल्या गेले. म्हणजेच गुरुवारी या आकडेवारीवरून रुग्णवाढीचा दर हा 30 टक्यापर्यंत पोचल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे.

शहरासह जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण निश्रि्चत वाढले आहे. हे प्रमाण त्यातुलनेत आणखीन वाढणार हेही स्पष्ट आहे. त्यामुळेच बाधितांच्या संख्येतसुध्दा रुग्णवाढीची टक्केवारी पडताळल्यास लक्षणीय वाढ होईल, असे चिंताजनक चित्र समोर येत आहे. जिल्हा महसूल प्रशासन, आरोग्य विभाग तसेच अऩ्य यंत्रणा रुग्णांच्या दरवाढीचा हा आलेख ओळखूनच आतापासूनच चिंतेत सापडले आहेत. हे त्यादृष्टीने उपाययोजनासुध्दा कराव्या लागणार हे ओळखून प्रशासनाने हालचाली सुरू देखील केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या    

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!