Share

राज्यसेवा परीक्षांसंदर्भात संभाजीराजेंची महत्वाची मागणी

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : राज्यात सद्य मराठा आरक्षणावरून वाद पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यातील पोलीस भरतीसह राज्यसेवा परीक्षा (एमपीएससी) स्थगिती उठेपर्यंत पुढे ढकलाव्यात अशी मागणी मराठा संघर्ष समितीतर्फे करण्यात आली. तर मराठा आरक्षणप्रश्नी ठोस निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानाबाहेर ६ ऑक्टोबरला आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

आता राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलाव्यातया या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पात्र लिहिले आहे. मराठा आरक्षणाचा तिढा आणि कोरोनाचा प्रादुर्भाव बघता राज्यसेवा परीक्षांसह सर्वच भरती प्रक्रिया पुढे ढकलाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.

परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि वयोमर्यादा देखील वाढवावी

मराठा आरक्षणाचा तिढा आणि कोविड च्या पार्श्वभूमीवर, राज्यसेवा परीक्षा आणि सर्वच भर्ती प्रक्रिया पुढे ढकलणे बाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. खेडेगावातील तरुणांना गेल्या अनेक महिन्यांपासून शहरापासून लांब राहावे लागले आहे. त्यांना व्यवस्थित अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. अश्या तक्रारी सर्व समाजातील तरुणांनी करायला सुरुवात केली आहे. मराठा समाजच्या तरुणांची मानसिकता तर उद्विग्न आहेच. सर्वच जातींतील मुलांची सरसकट वयाची अट 2 वर्षाने वाढवावी. जेणेकरून एज बार होण्याची भीती निघून जाईल आणि सर्वांना न्याय मिळेल, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/posts/1689607214530824

तर परीक्षा केंद्रच फोडू!

मराठा आरक्षणाला स्थगिती असतानाही एमपीएससी परीक्षा घेण्याचा घाट कोण घालत आहे? त्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी. ही परीक्षा तात्काळ पुढे ढकलण्यात यावी, अन्यथा एमपीएससीचे परीक्षा केंद्र फोडण्यात येईल, असा आक्रमक इशारा देखील आबा पाटील यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!