पुणे : पुणे शहराच्या हद्दीलगत असलेली 23 गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भातील अधिसूचना राज्य सरकारने बुधवारी (दि. 23) प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता पुणे महापालिका राज्यातील सर्वाधिक मोठ्या क्षेत्रफळाची महापालिका ठरली आहे.
दरम्यान, पुणे महापालिका हद्दीत शहरालगतची २३ गावे समाविष्ट करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. मात्र ही गावे महापालिका हद्दीतील भाग बनावी की नाही, याकरिता हरकती व सूचना (आक्षेप) दाखल करण्यास पुढील एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.
मागीलवर्षी राज्यात पुन्हा सत्ता बदल झाल्यानंतर उर्वरीत २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यानुसार राज्य शासनाने आज यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. २३ गावांचा महापालिकेमध्ये समावेश झाल्यास पुणे महापालिकेची भौगोलिक हद्द ही ४५० कि.मी. पेक्षा अधिक होणार आहे.
गावे समाविष्ट करताना राज्य शासनाने या गावातील विकासासाठी निधी द्यावा. तसेच या गावांमध्ये पीएमआरडीएच्यावतीने देण्यास आलेल्या विकास परवानग्यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून काही हिस्सा या गावातील विकासकामांसाठी द्यावा, अशी मागणीही महापालिकेने शासनाकडे केली आहे.
समाविष्ट होणारी २३ गावे
म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे – धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नर्हे, होळकरवाडी, औताडे- हांडेवाडी, वडाची वाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी आणि वाघोली.
महत्वाच्या बातम्या
- सर्वोच्च न्यायालयानेही एल्गार परिषदेला परवानगी नाकारली तरी आम्ही परिषद घेणारच : कोळसे पाटील
- नवा कोरोना विषाणू जास्त वेगानं फैलावत असला तरी तो जास्त घातक नाही ?
- कोरोनाच्या दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही : मुख्यमंत्री
- यंग हँडसम अनिल कपूर यांचा आज 64 वा वाढदिवस
- ३१ डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषद आयोजित करण्याची परवानगी द्या : कोळसे पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

