पुणे : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभचं देखील दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून दिवसभर प्रसारण सुरू राहणार आहे.
कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा अथवा पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
मात्र दुसरीकडे या निमित्ताने एल्गार परिषदेचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ३१ डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषद आयोजित करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली जात आहे. निवृत्त न्यायाधीश बीजी कोळसे पाटील पुणे पोलिसांकडे अशी मागणी केली आहे.
दैनिक सकाळने यासंदर्भात दिलेल्या वृत्तानुसार,परवानगीसाठी पुण्यातील गणेश कला, क्रिडा रंग मंच आयोजित करण्याचा त्यांचा आणि सहकाऱ्यांचा मानस आहे. स्वारगेट पोलिसांच्या हद्दीत हे ठिकाण येत आहे. त्यामुळे स्वारगेट पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षकांनी प्राप्त अर्ज विचारासाठी पुढे वरिष्ठ पोलिसांकडे पाठवला असून त्यावर निर्णय घेणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहेत;केंद्रीय कृषिमंत्र्यांचा पुनरुच्चार
- नवा कोरोना विषाणू जास्त वेगानं फैलावत असला तरी तो जास्त घातक नाही ?
- कोरोनाच्या दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही : मुख्यमंत्री
- ‘काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचा कणा मोडून टाकण्याचे पाप केंद्र सरकार करत आहे’
- काँग्रेसमध्ये लवकरच आणखी भाजपा नेते प्रवेश करणार : बाळासाहेब थोरात


