Share

औरंगाबादेत लोकप्रतिनिधी, स्वंयसेवी संस्थांच्या मदतीने वाढवणार लसीकरणाचा टक्का!

Published On: 

औरंगाबाद : शहरातील गेल्या ९ महिन्यातील लसीकरणाची आकडेवारी पाहता जुन्या शहरात लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. मात्र त्या तुलनेत नवीन औरंगाबाद शहरातील अन्य भागांमध्ये आत्तापर्यंत २ लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. जुन्या शहरात लसीकरणाला मिळणारा अल्प प्रतिसाद पाहता या भागांमधील लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त लसीकरण झाल्यास तिसऱ्या लाटेचा उद्रेक होणार नाही. सध्या शहरात लसींचा मोठ्या प्रमाणावर साठा आहे. औरंगाबाद शहरात जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. तसेच १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होताच पालिकेच्या जम्बो लसीकरण मोहिमेने मोठा वेग घेतला होता. पालिकेने शहरात ११५ वॉर्डात जागोजागी लसीकरण केंद्र सुरू करून लसीकरण करण्यावर जोर दिला होता. मात्र काही कालावधीनंतर लसीकरणाचा पुरवठा कमी झाला.

त्यावेळी लस घेण्यासाठी नागरिकांच्या उड्या पडत होत्या. मात्र लसींचा साठा पुर्ववत सुरळीत झाल्यानंतर लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद कमी झाला. पालिकेने नुकत्याच जाहिर केलेल्या शहरातील दहा लसीकरण केंद्रावर सर्वात कमी लसीकरण झाल्याची नोंद आहे. जुन्या शहरातील १० केंद्रांवर नऊ महिन्यात ६३ हजार ८४९ तर नवीन शहरातील १० केंद्रांवर २ लाख ७८ हजार २६७ एवढे लसीकरण झाले आहे.

या पार्श्‍वभूमीवर कमी लसीकरण झालेल्या केंद्रांवर लसीकरणाची संख्या वाढवण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन लोकप्रतिनिधींनी लस घेतल्याचे बॅनर दाखवून जनजागृती केली जाणार आहे. यासोबतच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने वॉर्डातील प्रत्येक घरोघरी जाऊन लस घेणे किती महत्त्वाचे आहे याबाबत महत्त्व विशद केले जाणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!