औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान महापालिकेने जवळपास साडेआठ लाख कोरोना चाचण्या केल्या आहेत. यातील तब्बल पावणेदोन लाख चाचण्यांच्या अहवालाची नोंदच नव्हती. या विषयी वृत्त प्रसिद्ध होताच ते पावणेदोन लाख अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दररोज चा अहवाल तयार करताना केवकोरोना सुरु झाल्यापासून औरंगाबादेत झाल्या ८ लाख चाचण्या!ळ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद घेण्यात आली. निगेटिव्ह अहवाल समाविष्ट करण्याचे राहून गेले त्यामुळे आकडेवारीत घोळ झाल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ मेघा जोगदंड यांनी सांगितले.
कोरोनाच्या दुसर्या लाटेला रोखण्यासाठी पालिकेने शहरांतर्गत मोबाइल टीमसह सिटी एन्ट्री पॉइंटवर पर जिल्ह्यातून येणारे प्रवासी, संचारबंदीत शहरात फिरणारे नागरिक, विमानतळ व रेल्वेस्टेशनवर येणार्या प्रवाशांची नित्याने चाचणी केली. यातून पॉझिटिव्ह आढळलेल्यांना थेट कोविड केअर सेंटरमध्ये पाठवले. यामुळे संसर्गाला मोठा ब्रेक लागला. दरम्यान, मागील चारच महिन्यात तब्बल चार लाख कोरोना चाचण्या केल्या गेल्या. कोरोना सुरू झाल्यापासून आजवर एकूण ८ लाख ५५ हजार ६०१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
यापैकी ५ लाख ८९ हजार ३७७ निगेटिव्ह तर ९१ हजार १२४ पॉझिटिव्ह अहवाल आले. मात्र या दोहोंच्या आकडेवारीतून १ लाख ७५ हजार चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले की निगेटिव्ह? असा प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबत डॉ. जोगदंड यांनी सांगितले की, पॉझिटिव्हची एकही केस आम्ही सोडलेली नाही. मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या पॉझिटिव्ह रिपोर्ट्सचीच नोंद घेण्यात आली. मात्र काही ठिकाणच्या निगेटिव्ह रिपोर्ट्सची नोंद रोजच्या अहवालात समाविष्ट करण्याचे राहून गेल्याचे निदर्शनास आले.
महत्त्वाच्या बातम्या
- पैठणच्या एकनाथ महाराज पालखी दिंडी सोहळ्याचे औपचारिक प्रस्थान, पादुका १८ दिवस नाथमंदिरात मुक्कामी
- रोजगार निर्मितीसाठी दिव्यांगांना ‘ई ट्रायसिकल’; पालकमंत्री शिंगणे यांच्या हस्ते वाटप
- औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर विकसित करण्यात यावे, आ.अंबादास दानवेंची मागणी!
- गावकरी आले मदतीसाठी धावून! अखेर ‘त्या’ निराधार वयोवृध्दांना मिळाला आधार
- ‘चूक करणाऱ्या प्रत्येकाला परिणाम भोगावे लागणार, यादी मोठी’; चंद्रकांतदादांना नेमकं काय सुचवायचंय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

