औरंगाबाद : गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. मात्र, आता राज्यभरात एस. टी. बसेस काही प्रमाणात रस्त्यावर धावायला लागल्या आहेत. रविवारी ४९ मार्गांवर १४९ बसेस धावल्या असून राज्यात ४,६१९ प्रवाशांनी प्रवास केला आहे. मात्र शहरात अजून पर्यंत एकही बस धावलेली नाही. मध्यवर्ती बस स्थानकातील ३ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली असून सिडको बस स्थानकातील १५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. शहर बससेवेवरही एसटी संपाचा मोठा परिमाण झाल्याने औरंगाबादकर संकटात सापडले आहेत.
गेले १५ दिवस एसटी बंद असल्याने सामान्य चाकरमानी बेहाल झाले आहेत. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मुख्य मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी ७ नोव्हेंबरपासून संपावर गेले आहेत. मात्र अजूनही यावर कुठलाही तोडगा काढण्यात महामंडळाला यश आलेले नाही. एसटी संपाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे.
कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने एसटी प्रशासनाने निलंबनाचे हत्यार उपसले आहे. आत्तापर्यंत शहरात १८ कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आले आहे. त्याचबरोबर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही शहरात कमी आहे. आत्तापर्यंत यांत्रिकी विभागातील ५ कंत्राटी कर्मचारी रुजू झाले आहेत. मात्र त्यातुलनेत राज्यात कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून, ४,१४४ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहेत. रविवारी राज्यभरातून ४९ मार्गांवर शिवनेरी, शिवशाही आणि साध्या अशा एकूण १६७ बसेस धावल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मी तर एक छोटे प्यादे आहे, मोठे खेळाडू तर….; सचिन वाझेचे खळबळजनक वक्तव्य
- परमबीर सिंह आणि अनिल देशमुख यांच्यातील वादावर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता
- विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं; चंद्रकांत पाटलांचा विश्वास
- वीर दासने ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण , म्हणाला..
- ‘आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो’, मलिकांच्या फोटोला वानखेडेंचे फोटोनेच प्रत्युत्तर

