Share

लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचे स्वातंत्र्य तर पोस्टरला चपलाने मारणे ही अत्यंत खालची पातळी : अमृता फडणवीस

Published On: 

मुंबई : गेले २ दिवस अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पोलिसांसह मुंबई शहरावर केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. तर, कंगना देखील आपल्या मतावर ठाम असून निकामी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केल्याने या वादाला वेगळे वळण दिले जात आहे, अशी भूमिका तिने मांडली.

सद्या ट्विटरसह प्रत्यक्षात देखील सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी तपासावरून सुरु झालेला हा वाद आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाला दिलेल्या इशाऱ्यानंतर मराठी-अमराठी होऊ लागला आहे. यानंतर, राज्यभरातून कंगनाच्या विरोधात तसेच काही प्रमाणात समर्थनार्थ भूमिका देखील मांडल्या जात आहेत.

कंगना राणावत कोण हे मी ओळखत नाही- प्राजक्त तनपुरे

काल दिवसभरात अनेक आरोप-प्रत्यारोप झाले, यानंतर काही ठिकाणी कंगनाचा निषेध करताना तिच्या पोस्टरला चपलाने मारहाण करण्यात आली, यावरूनच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कोणाचेही नाव न घेता ट्विट केले आहे.

पूर्व विदर्भातील पुराचे संकट अस्मानी संकटापेक्षा ते मानवनिर्मीत अधिक, या माजी मंत्र्यांची प्रतिक्रिया

अमृता फडणवीस यांनी, ” एखाद्याच्या मुद्द्यावर आपण सहमत नसू शकतो. मात्र लोकशाहीत असलेल्या मत व्यक्त करण्याच्या अधिकाराचा मान आपण राखला पाहिजे.बोलण्याचे, व्यक्त होण्याचे, चळवळ करण्याचे आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हे कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही एखाद्याच्या मताशी असहमत असाल तर त्याला प्रतिवाद करा. पण म्हणून विरोधी मत व्यक्त करणाऱ्याच्या पोस्टरला चपलांनी मारणे ही अत्यंत हीन पातळी आहे.” असे मत ट्विटद्वारे व्यक्त केले आहे.

काय आहे हे प्रकरण?

अभिनेत्री कंगना रणौत हिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलिसांवरच संशय घेत आरोप केले . तर, “मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते अशा आशयाचे ट्विट केले होते. दरम्यान, मला मुंबईत न येण्याची धमकी दिली जात आहे. मुंबईत असुरक्षित वाटत असून मुंबई आता पाकव्याप्त काश्मिरसारखी झाली आहे,” असे ट्विट अभिनेत्री कंगनाने केल्यानंतर आता तिला चांगलेच लक्ष्य केले जात आहे.

पत्रकारांना द्या ५० लाखाचे विमा कवच, ‘या’ जिल्ह्यात होतेय मागणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!