मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोन दिग्गज नेत्यांमधील वाद आणि यावरून सुरु असलेले राजकारण उभा महाराष्ट्र पाहत आहे. सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप केले असून सत्ताधारी नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. एक दोन नव्हे तर तब्बल डझनभर मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप केल्याने सत्ताधारी नेते चांगलेच घायाळ झाल्याचे दिसत आहे.
किरीट सोमय्या यांच्यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील वेळोवेळी पत्रकार परिषद घेवून सोमय्या यांची पाठराखण करताना दिसून येत आहे. पाटील हे आपल्या पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांवर अनेक गंभीर आरोप करत आहेत तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांना जशास तसे उत्तर देत आहेत.
आज देखील पाटील यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. सोबतच देवेंद्रजी असे दबंग नेते आहेत जे 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात असं म्हणाले. दरम्यान, आता राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
महाराष्ट्राचे हक्काचे GST चे पैसे देत नाही निदान यांच्यावरील करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल.@ChDadaPatil @AjitPawarSpeaks @NCPspeaks
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 20, 2021
त्या म्हणाल्या, चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे. पुढे त्या म्हणाल्या, महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा. केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राचे हक्काचे GST चे पैसे देत नाही निदान यांच्यावरील करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल असा टोला देखील चाकणकर यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राजर्षी शाहू महाराज अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांना सरकारी वेतनश्रेणी लागू करावी – राजू वाघमारे
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- ‘सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच’, हसन मुश्रीफांचा आरोप
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

