नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील सीमा वादावर तोडगा काढण्यासाठी आज भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ पातळीवर बैठक होणार आहे. मागच्या महिन्याभरापासून या भागामध्ये तणाव असून दोन्ही देशांचे सैनिक परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. एकाच बैठकीतून लगेच तोडगा निघणार नाही याची दोन्ही देशांना कल्पना आहे. पण सकारात्मक चर्चा सुरु झाल्यास तणाव निवळण्यास मदत होईल.
अमेरिकेत कोरोना लसीचे 20 लाख डोस तयार, वितरणासाठी वाहतूक व्यवस्था सज्ज; ट्रम्प यांचा दावा
शनिवारी होणाऱ्या महत्वाच्या बैठकीआधी शुक्रवारी दोन्ही देशांमध्ये सचिव स्तरावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून चर्चा झाली. यावेळी मतभेदाचे पर्यावसन वादामध्ये न करता चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताबरोबर सध्या सुरू असलेला सीमा तंटा योग्य रीतीने सोडविण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही चीनने शुक्रवारी दिली. शनिवारी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान वाटाघाटी होणार आहेत, या पार्श्वभूमीवर चीनकडून हे विधान करण्यात आले आहे.
दरम्यान,परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव (पूर्व आशिया) नवीन श्रीवास्तव यांनी यांनी सायंकाळी चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक वू जियांगाव यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशातील मतभेद शांततेने आणि चर्चेच्या मार्गाने सोडविण्याचे यात सहमती दर्शविण्यात आली.
देशात कोरोना रुग्णाची विक्रमी वाढ, इटलीला मागे टाकत भारत सहाव्या स्थानावर
मागच्या महिन्याभरापासून या भागामध्ये तणाव असून दोन्ही देशांचे सैनिक परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. एकाच बैठकीतून लगेच तोडगा निघणार नाही याची दोन्ही देशांना कल्पना आहे. पण सकारात्मक चर्चा सुरु झाल्यास तणाव निवळण्यास मदत होईल. सध्या दोन्ही देशांनी लडाखमध्ये मोठया प्रमाणावर सैन्य तैनात केले असून युद्धसाहित्य सुद्धा सज्ज ठेवले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

