Share

अमेरिकेत कोरोना लसीचे 20 लाख डोस तयार, वितरणासाठी वाहतूक व्यवस्था सज्ज; ट्रम्प यांचा दावा

Published On: 

वॉशिंग्टन : गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ९,८८७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २,३६,६५७ इतका झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात प्रत्येक दिवशी कोरोनाचे जवळपास १० हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे इटलीला मागे टाकत सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आला आहे. अमेरिका या यादीत सगळ्यात वरच्या क्रमांकावर आहे. मात्र आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेने कोरोनावर लस विकसित केल्याचा दावा केला आहे.

देशात कोरोना रुग्णाची विक्रमी वाढ, इटलीला मागे टाकत भारत सहाव्या स्थानावर

“कोरोनाच्या लसीसंदर्भात गुरुवारी आमची महत्त्वपूर्ण बैठक झाली. वैज्ञानिकांनी कोरोनावर मात करणारी एक लस विकसित केली आहे. या लसीचे 20 लाख डोस तयार आहेत. ही लस सुरक्षा संदर्भातील चाचणीत यशस्वी ठरली तर या लसीचं वितरन सुरु केलं जाईल”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

“कोरोना लसीबाबत आम्ही अविश्वसनीय असं चांगलं काम करत आहोत. या कामात आम्हाला सकारात्मक यश मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाची लस तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली जात आहे. लस विकसित करण्याच्या कामात प्रगतीदेखील होत आहे. ही लस सुरक्षा तपासणीत यशस्वी ठरली तर आमच्याकडे या लसीचे 20 लाख डोस उपलब्ध आहेत. याशिवाय विविध भागात लस पोहोचवण्यासाठी वाहतूक व्यवस्थादेखील सज्ज आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

प्रेरणादायी : मुंबईत ९७ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

“जगभरातील 186 देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. या देशांमध्ये कोरोनामुळे अनेकांचा जीव गेला. कोरोनाची लस विकसित करण्याच्या दृष्टीने आमचं जगभरातील देशांसोबत काम सुरु आहे. आम्ही चीनसोबतही काम करत आहोत. मात्र, जे झालं ते खूप वाईट झालं. ते व्हायला नको होतं”, असंदेखील डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!