Share

देशात कोरोना रुग्णाची विक्रमी वाढ, इटलीला मागे टाकत भारत सहाव्या स्थानावर

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ९,८८७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २,३६,६५७ इतका झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात प्रत्येक दिवशी कोरोनाचे जवळपास १० हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे इटलीला मागे टाकत सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आला आहे.

ज्योतिरादित्य सिंधियांच्या ट्विटरवरून भाजप गायब, राजकीय चर्चांना उधान

देशातील तज्ज्ञांनी काही दिवसांपूर्वी जून किंवा जुलै महिन्यात भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचेल, असा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज आता खरा ठरताना दिसत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत देशात सातत्याने ९५०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जगात सर्वप्रथम कोरोनाचा मोठा फटका बसलेल्या इटलीला रुग्णसंख्येच्याबाबतीत भारताने मागे टाकले आहे. त्यामुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे.

दरम्यान, राज्यात शुक्रवारी १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी कोरोनाच्या २४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४२ हजार २१५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

प्रेरणादायी : मुंबईत ९७ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख २२ हजार ९४६ नमुन्यांपैकी ८० हजार २२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याचे प्रयोगशाळा चाचण्यांचे दर दशलक्ष प्रमाण ३८२७ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २८३२ इतके आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!