Share

#Coronavirus : स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना ‘या’ महत्त्वाच्या सूचना

Published On: 

तक्रारवाडी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. यामुळे भिगवण पोलीस ठाणे आणि स्थानिक प्रशासनाक़डून जे गावातील लोक दुचाकीवर अनावश्यक फिरताना दिसल्यास त्याची दुचाकी जप्त करून चालक आणि मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.

गावातील नागरिकांना कोरोना रोगाचा प्रसार होऊ नये म्हणुन गावातील नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी. याचबरोबर विनाकारण गाडी घेऊन बाहेर फिरणाऱ्यांची गाडी जप्त करण्यात येणार असल्याची सूचना गावातील ग्रामसेवक रविंद्र शेलार, पोलीस पाटील अमर धुमाळ आणि तलाठी महादेव भारती यांनी दिलेल्या आहेत.

सर्व ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आलेली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांकडून जनतेला घरातून बाहेर न पडणे बाबत वारंवार आवाहन करण्यात येत आहे. परंतु काही लोक सदरच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अडथळे येत आहेत. पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून विशेषतः दुचाकीस्वार लोक व युवक रस्त्यावरती अनावश्यक फिरताना वारंवार दिसत आहेत.

दरम्यान, अनेक लोक गावातील असतात. भाजीपाला आणि दूध आणणे, किराणामाल घेऊन येणे मेडिकलमध्ये जाणे अशा क्षुल्लक कारणासाठी आपल्या दोन चाकी वाहनांचा वापर करताना आढळत आहे. अशा कारणांकरिता गाड्या बाहेर घेऊन आलेले आढळून आल्यास त्यांचे वाहन जप्त करण्यात येणार आहे. असे आवाहन गावातील स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!