🕒 1 min read
Cabinet meeting । मुंबई : आज शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. हि बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील पार पडली. यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निर्णयांना स्थगिती देण्यापासून ते नवीन निर्णय जाहीर करण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. तसेच गणपती उत्सव काळात राज्यभरात विविध गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना दाखल छोट्या केसेस रद्द करण्यात आल्याची घोषणा शिंदे यांनी केलीय.
आजच्या कॅबिनेट बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय
• राज्यात वीज वितरण यंत्रणा सुधारणार. ग्राहकांना स्मार्ट व प्रिपेड मीटर्स.
महावितरण व बेस्ट उपक्रमामार्फत सुधारित वितरण क्षेत्र योजना-सुधारणा अधिष्ठित आणि निष्पत्ती-आधारित योजना (Revamped Distribution Sector Scheme Reforms-Based and Results-Linked)
(उर्जा विभाग)
• अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन योजनेच्या शेतकऱ्यांना वीज दरात सवलत देणार.
(उर्जा विभाग)
• दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती
(विधि व न्याय विभाग)
• विधि व न्याय विभागात सह सचिव (विधि) (गट-अ) पद नव्याने निर्माण करणार
(विधि व न्याय विभाग)
• लोणार सरोवर जतन, संवर्धन व विकास आराखड्यास मान्यता. (वन विभाग)
• १५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढलेल्या ५० अतिरिक्त जागांसाठी राज्याचा हिस्सा
(वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)
• राज्यात कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर ३ नवीन समाजकार्य महाविद्यालये स्थापणार
(सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)
• ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना प्रकल्पास ८९०.६४ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता.
(जलसंपदा विभाग)
• जळगांव जिल्ह्यातील वाघुर प्रकल्पास २ हजार २८८.३१ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता
(जलसंपदा विभाग)
• ठाणे जिल्ह्यातील भातसा पाटबंधारे प्रकल्प १ हजार ४९१.९५ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता.
(जलसंपदा विभाग)
• हिंगोली जिल्ह्यात
‘मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र’
(कृषि विभाग)
• शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान. पूर व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा लाभ
(सहकार विभाग)
ग्रामीण भागातील भूमिहीन लाभार्थीना जागा देण्याबाबत विविध सवलती
(ग्राम विकास विभाग)
राजकीय व सामाजिक आंदोलनातील मार्च २०२२ पर्यंतचे खटले मागे घेण्याबाबत कार्यवाही
(गृह विभाग )
महत्वाच्या बातम्या :
- Deepak Kesarkar | शिवसेना पक्षप्रमुखपद उद्धव ठाकरे यांच्यासाठी रिक्त – दीपक केसरकर
- Pravin Darekar : त्याग काय असतो ते देवेंद्र फडणवीसांकडून शिकावं : प्रवीण दरेकर
- Maharashtra Rain Update | राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस ; NDRF व SDRF च्या १४ तुकड्या तैनात
- Pravin Darekar | भारतीय जनता पार्टीचा जीव मुंबईत आहे – प्रवीण दरेकर
- Sanjay Jadhav : रामदास कदम कालपर्यंत मराठा नव्हते का?; संजय जाधव भडकले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
