चंद्रपुर – दीड वर्षापासून कोरोनामुळे बंद असलेली जिल्ह्यातील मंदिरे कालपासून उघडल्याने नवरात्रोत्सव जणू चैतन्य घेऊन आला आहे. कोरोना संसर्गामुळे सरकारने प्रतिबंध लागू केल्याने जिल्ह्यातील सर्व मंदिरे दीड वर्षापासून बंद होती. कोरोना संसर्ग आता ओसरण्याच्या मार्गावर आला. रुग्णांची संख्या दररोज चार किंवा पाचच्या पुढे जात नसल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात हेच चित्र असल्याने राज्य सरकारने गुरुवारपासून प्रतिबंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा प्रशासनाने या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. गुरुवारी मंदिरे उघडण्याची परवानगी दिल्याने चंद्रपुरातील माता महाकाली, तसेच जिल्ह्यातील सर्वच मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले.
दरम्यान, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी चंद्रपुरात आता मंदिरातही लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. कालपासून राज्यातली प्रार्थनास्थळं उघडण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या महाकाली मंदिरात प्रवेश करताना भक्तांना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आलं आहे. ज्या भाविकांनी लस घेतलेली नाही, त्यांच्यासाठी महाकाली मंदिर परिसरात लसीकरण होणार आहे. सकाळी सात ते सायकांळपर्यंत लसीकरण मोहीम सुरु राहणार आहे.
दरम्यान, राज्यात येत्या 6 दिवसात 90 लाख नागरीकांचं लसीकरण करण्याच्या उद्देशानं मिशन कवच कुंडल या विशेष लसीकरण मोहिमेची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल केली. आजपासून 14 ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या मोहिमेत दररोज 15 लाख जणांना लसीच्या मात्रा देण्यात येणार आहेत. राज्यातील सव्वानऊ कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट आहे. त्यापैकी सहा कोटी नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं असून आणखी सव्वातीन कोटीपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण शिल्लक आहे. लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
या विशेष मोहिमेसाठी लस देण्यासाठी आवश्यक असलेल्या सिरिंजसह मनुष्यबळ उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी या अभियानात इंडियन मेडिकल असोसिएशन, खाजगी डॉक्टर, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्वयंसेवी संस्था अशा संस्थांसह समाजातल्या विविध घटकांना सहभागी करुन घेणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या
- बच्चू कडू यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप; बबलू देशमुख व वीरेंद्र जगताप यांच्यावर गुन्हा दाखल
- ‘ड्रग्ज प्रकरणाचे राजकारण करणाऱ्या मलिक यांनी ते पालकमंत्री असलेला जिल्हा वाऱ्यावर सोडला’
- राज्यात येत्या 6 दिवसात 90 लाख नागरीकांचं होणार लसीकरण; टोपेंनी केली ‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेची घोषणा
- कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम; विजेचा अनावश्यक वापर टाळण्याचे महावितारांचे आवाहन
- ‘देशाचे आणि महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंना शासनाच्या सेवेत सामावून घेण्यात आल्याने खेळांना प्रोत्साहन मिळत आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

