Share

‘रखडलेला शक्ती कायदा महिलांच्या सुरक्षेसाठी लवकर लागू करा’, ठाकरे सरकारला घरचा आहेर

Published On: 

बीड : मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत ३२ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता सर्व स्तरातून केली जात आहे.

या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून गुन्हेगारास कठोरात कठोर शिक्षा केली जाईल’ असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच तपासाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेत.

यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या औरंगाबाद आणि परभणी जिल्हा पक्ष निरीक्षक रेखा फड यांनी आपली भूमिका मांडली आहे. साकीनाका घटनेने तर आम्हाला निरुत्तर केले आहे. पण गेल्या आठवड्या पासून वारंवार घडलेल्या पुण्यातील दोन अल्पवयीन मुलींवरील बलात्कार तसेच आज अमरावती मध्ये पीडितेने केलेली आत्महत्या या अशा अनेक घडणारे घटना कुठेतरी थांबायला पाहिजेत, पण त्यासाठी बऱ्याच दिवसांपासून रखडलेला शक्ती कायदा राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी लवकरात-लवकर यावा अशी विनंती रेखा फड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दरम्यान, साकीनाका घटना आणि शक्ती कायद्यावरून विरोधक महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी या कायद्यासाठी मु्ख्यमंत्र्यांकडे आग्रह धरताना दिसून येत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला हा घरचा आहेर मिळालाय अशी टीका विरोधक करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!