अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असतानाच तरुणीचा मृत्यू झाला.
यानंतर अखेरचा एकदा मृतदेह पाहण्याची विनंती करुनही पोलिसांनी बळजबरीने अंत्यसंस्कार केले असा कुटुंबाचा आरोप आहे. ही घटना म्हणजे चिंताजनक बाब असून कायदा व सुव्यवस्था सांभाळणारेच कमी पडत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली आहे.
सत्यजित तांबे पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेश मधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अत्याचार पीडित दलित युवतीच्या मृतदेहावर रात्री अडीच वाजता तिच्या कुटुंबियांच्या अनुपस्थितीत, पोलिसांच्या मदतीने अंत्यसंस्कार केले. या मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन करण्यासाठी निघालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी, रणजीतसिंह सुरजेवाला आदी नेत्यांना योगी सरकारने उत्तर प्रदेशच्या प्रवेशद्वारावरच रोखले. अशी कोणती भीती योगी सरकारला वाटत होती की त्यांनी गांधी परिवारावर दडपशाही करून त्यांना अटक केली, असे तांबे म्हणाले.
हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारवर सर्वच स्तरातून जोरादर टीका केली जात आहे. सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, कंगना राणावत यावर बोलणारे भाजप नेते आज गप्प आहेत.
महाराष्ट्रात एका छोट्या गोष्टीवरून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या कंगणाचे समाजासाठी योगदान काय, असा सवाल करुन, दंगलराज सुरु असलेल्या उत्तर प्रदेशात महिला भगिनी सुरक्षित नाहीत. त्यामुळे राष्ट्रपती महोदयांनी उत्तर प्रदेशात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- शेतक-यांना भूमिहीन करून उद्योगपतींचा फायदा करण्याचा भाजप सरकारचा डाव
- प्रचंड दबावानंतर हाथरस प्रकरणी योगी सरकारची मोठी कारवाई
- अधिकाऱ्यांचे निलंबन करून जबाबदारी झटकू नका,योगींच्या राजीनाम्याची प्रियांका गांधींची मागणी
- अयोध्येनंतर काशी,मथुरेची चर्चा;पवारांना वाटतेय ‘ही’ भीती
- उत्तर प्रदेशातील गुंडा राजमध्ये महिला सुरक्षित नाहीत- यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

