Share

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा – अजित पवार

Published On: 

बारामती – बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळली पाहिजे, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या व्हिआयटी हॉलमध्ये ‘कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन’ व ‘विकास कामांचा आढावा बैठक’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव , तालुका कृषि अधिकारी पडवळ , सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने दक्ष राहून काम करावे. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याकडे विशेष लक्ष द्यावे. रूग्णाचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे तसेच तपासणी संख्या वाढवावी. कोविड आणि नॉन कोविड रूग्ण या दोघांनाही वेळेत उपचार मिळणे आवश्यक असल्याने आरोग्य विभागाने याची खबरदारी घेण्याचे तसेच नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.

कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्रीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या आर्थिक वर्षामध्ये ज्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे त्याकरीता मंजूर करण्यात आलेल्या निधीचा वेळेत पूर्णपणे वापर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तांदूळवाङी येथील पिण्याच्या पाण्याचा तलाव व सुरु असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. बारामती तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अवैद्य धंदे चालणार नाहीत याची खबरदारी पोलीस विभागाने घ्यावी. अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या कडक सूचना यावेळी पोलिसांना केल्या.

कोरोनामुक्त झाला म्हणून डीजे लाऊन केलं स्वागत,मित्रमंडळी अडकले कायद्याच्या कचाट्यात

“यंदा गणेशोत्सव नव्हे तर आरोग्योत्सव”; लालबागचा राजाचा ऐतिहासिक निर्णय

उद्धव ठाकरे – अजित पवारांची महत्त्वपूर्ण बैठक संपली, महत्वाच्या विषयावर चर्चा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!