Share

“यंदा गणेशोत्सव नव्हे तर आरोग्योत्सव”; लालबागचा राजाचा ऐतिहासिक निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यातच मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येनं ७५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमधील अनेक गणेशोत्सव मंडळांनी लहान आकाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवासंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

“यंदा राजाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार नाही,” असं लालबागचा राजा मंडळाचे सुधीर साळवी यांनी सांगितले. त्याऐवजी मंडळाकडून आरोग्यसेवेच्या दृष्टीनं महत्त्वाचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये रक्तदान आणि प्लाज्मादानचा समावेश आहे. यासाठी मंडळाकडून कॅम्पचं आयोजन करण्यात येणार आहे. श्री गणेश मूर्तीची स्थापनाच होणार नसल्यामुळे यंदा लालबागचा राजाच्या दर्शनाला कोट्यवधी भाविकांना मुकावं लागणार आहे. याशिवाय आगमन, पाद्यपूजन सोहळेदेखील रद्द केले आहेत.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदाचा ८७ वा गणेशोत्सव मूर्ती स्थापना व विसर्जन असा कोणताही सोहळा साजरा न करता ‘आरोग्य उत्सव’ म्हणून श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा करण्यात येणार आहे.

असा असेल आरोग्य उत्सव –

प्लाज्मा थेरपीला प्राधान्य देऊन अधिकाधिक रुग्णांना जीवनदान देण्याचा संकल्प केला आहे. तर ११ दिवस प्लाज्मा आणि रक्तदानाच्या उपक्रमाचं आयोजन केल आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देखील २५ लाखांचा धनादेश देणार असून कोरोना लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस बांधवांच्या कुटुंबीयांना मदतीचा हातभार लावणार आहेत. गलवान खोर्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान देखील या ११दिवसात करणार आहे. रक्ताचा तुटवडा जाणवू लागताच 1546 रक्तदात्यांचं रक्तदान, जनता क्लिनिक माध्यमातून आतापर्यंत रुग्णवाहिका, डॉक्टर यांच्या मदतीनं दक्षिण मुंबईत जनता क्लिनिक उपक्रम तसेच मंडळाची डायलिसिस सेवा कोरोना संकट काळातही सुरू राहणार.

राज्यात यंदा समाधानकारक पाऊस, हवामान विभागाकडून मान्सूनचे पहिले अंदाज पत्रक जाहीर

जय हरी विठल … आता घर बसल्या असे घ्या विठ्ठल-रुक्मिणीचे थेट दर्शन

मोदींच्या ‘या’ निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात नवे रोजगार निर्माण होणार – चंद्रकांत पाटील

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!